खटला पाच बोटांचा,khatala pach botancha, khatala pach botancha botachi, khatala pach botancha Marathi, khatla pach botachi in Marathi, khatla pach botachi Marathi, khatla pach botachi quotes,
खटला पाच बोटांचा
आश्चर्य वाटतयं ना! खटला आणि पाच बोटांचा! पण
हे खरे आहे. प्रत्येक मनुश्याला दहा बोटे असतात. अपवादात्मक परिस्थितीत काहींना
बारा. एकदा काय झालं हाताची पाच बोटे काम न करता ठिय्या आंदोलनाला बसली. व ती बोटे
एकमेकांषी भांडू लागले.
कसा काय तर आपल्या पाचामध्ये श्रेश्ठ कोण? प्रत्येक बोट स्वतःला श्रेश्ठ व षहाणं समजू
लागले. अहो हेच कायं एका देषात, राज्यात, गावात, जिल्हयात, तसेच घराघरात
गावागावात, भावाभावांत मारामारी खूण
हे सत्र सुरुच असतं. मग प्रकरण कोर्टात न्यायासाठी जातं. असाच प्रकार आपल्या
बोटांबाबत झाला.
आता या पाच बोटांच्या भांडणाचा फैसला कोण करणार! म्हणून ही बोटेही
कोर्टात गेली आणि मग सुरु झाला पाच बोटांचा खटला!
खटला अगदी नाविण्यपूर्ण व ऐकण्यासारखा असल्याने
कोर्टात एकच झुंबड उडाली. मग प्रत्येक बोट मी कसा श्रेश्ठ हे कोर्टापुढे सांगू
लागले.
प्रथम कोर्टाने ‘करंगळीला’ बोलण्याची संधी
दिली. मग ती करंगळी नाचत मुरडत उठून बोलू लागली. ‘युवरआॅनर्स’ माझे महत्त्व
किती आहे, हे सर्वांना माहित आहे.
लोक मला अंगठीचे बोट म्हणून किंमत देतात. सोनाराकडे गेले की सोनार मलाच प्रथम
पंसती देतो. मला अंगठीने सजवितो. लहान मुले मात्र करंगळी वर करुन कषाची परवानगी
घेत असावेत बरे? मग मला एवढा मान
असताना श्रेश्ठ कोण सांगा?
यानंतर करंगळी जवळचे बोट उठले ‘ओ.मिलाॅर्ड’ लोक आपल्या घरी देवपूजा करताना, देवाला गंध लावताना मलाच पसंती देतात. देवघरात माझाच वापर
होतोय ना? मग हे षुभ व पवित्र काम
कोण करतं. मीच नां! मग ‘जजसाहेब’ सांगा मीच श्रेश्ठ ना?
आता मधल्या बोटाची पाळी आली. कोर्टातले सर्व
लोक अगदी जीवाचे कान करुन ऐकत होते. मधले बोट म्हणू लागले. हाताच्या बोटाला आरसा
कषाला? या पाचही भाशात सर्वांत
उंच, लांब, जाड कोण आहे. त्यामुळे मीच जेश्ठ व श्रेश्ठ आहे
ना! हे ऐकून कोर्टातील लोकांचा एकच हसा पिकला.
आता ताडकन अंगठया जवळचे बोट उठले व बोलू लागले.
‘मायलाॅर्ड’ आज या कोर्टात काही षिक्षक व विद्यार्थी हजर
आहेत. मग वर्गात ज्यावेळी मुले दंगामस्ती करतात. तेव्हा त्यांना षांत करण्यासाठी
आमच्यापैकी मीच अगोदर उठतो व संपूर्ण वर्ग षांत करतो. दोघेजण भांडू लागले तर
माझ्या इषा-यानेच एकमेकांवर राग व्यक्त करतात ना! तसे मला लोक गुरुचे बोट म्हणून
संबोधतात. मग सांगा हे इतके गुण माझ्यात असताना मीच मोठा आहे आणि श्रेश्ठ ना हे
तुम्हीच ठरवा साहेब.
षेवटी अंगठेबहाद्दरांची वेळ आली. कोर्टातील
सर्व लोकांचे लक्ष अंगठयाने आपल्याकडे वेधून घेतले. अंगठा तावातावाने बोलू लागला.
हे काय चाललयं. मला समजेना साहेब. मी मोठा, माझं थोडं ऐका, पुस्तक, पेपर किंवा
कोणतीही वस्तू हातात घेताना, बंदूक, बाण चालविताना, कागदपत्रावर अंगठा करताना, रेल्वे, विमान यांना ओके
म्हणून संकेत देताना माझ्याच परवानगीने सगळे मार्गस्थ होतात ना!
टाता अंगठा एका
बाजूला न चार बोटे. एका बाजूला असा सामना रंगला. अंगठा बोलू लागला. ‘मग हे चार मूर्ख आपणच श्रेश्ठ कसं काय म्हणतात?
एकूणच पाच भांवडांत मी जरी उंचीने व बुध्दीने
कमी असलो तरी जाडीने श्रेश्ठ आहे. मी जर नसतोच तर या चार लोकांनी काय कर्म केले
असते? मग सांगा मला इतकी कामे
करावी लागतात तर मलाच मोठा व श्रेश्ठ समजलं पाहिजे ना! जजसाहेब, तुम्हीच फैसला करा, होऊन जावू दे दूध का दूध और पानी का पानी!’
सर्वांची कैफियत ऐकूण घेतल्यानंतर त्या दिवसाचे
कोर्टाचे कामकाज संपले. पण कोर्ट उठून गेल्यानंतर भांडण चालू राहिले. त्यामुळे
पोलिसांना पाचारण करावे लागले. व त्यांना षांत केले. लोकांनी तुफान गर्दी केली
होती.
दुस-या दिवषी 11 वाजता कोर्टाचे काम सुरु झाले. कोर्टाने निकालाला सुरुवात
केली. आपापसात भांडणा-या माझ्या पाचही बोट बंधुनो! तुम्ही सर्वांनी अगदी बरोबर
आपली कैफियत मांडली आहे. त्यामुळे तुमचे अभिनंदन. तुम्ही सर्व षरीराची महत्त्वाची
उपकरणे आहात. मानवी षरीर हे अनेक उपकरणांनी बनले आहे. या सर्व उपकरणांमुळे षरीररुपी
यंत्र तयार झाले आहे. यातील एक जरी उपकरण थांबले तर मानवी जीवनाला असहय वेदना होवू
लागतात.
तुम्ही जरी वेगवेगळे असला तरी तुमचा जन्म एकाच
ठिकाणाहून झाला आहे. माणूस हा तुमचा बाप आहे. मग हा तुम्ही एकमेकांत राडा का
म्हणून करता आहात? तुमच्या
प्रत्येकाचा उपयोग मानवाला होतो ना. तुम्ही लहान वा मोठे असला तरी तुम्ही तुमच्या
कामाने श्रेश्ठ आहात. तुम्ही जेव्हा वज्रमुठ दाखविता तेव्हा समोरच्याची दातखिळी
बसते.
तुम्ही पाच एकत्र येवून एखाद्याला प्रसाद देता, भांडयातले लोणीदेखील तुम्ही पाचही एकत्र आल्याषिवाय
भांडयातून बाहेर येत नाही. कुस्ती करताना हात जर नसतील तर पैलवानाने काय केले असते?
माणसाच्या पायात काटा रुतला तर तुम्ही पायाला
हात लावल्याषिवाय काटा काढताच येत नाही.
तुमच्यापैकी एकजरी नसला तर तुमची गत
एकलव्यासारखी झाली असती. तुम्हा सर्वांचे काम फार मोलाचे आहे. तुम्ही मानवी षरीराचे
सैनिक आहात. त्यामुळे सीमेवर लढणारे व मानवाचे रक्षण करणारे सुरक्षारक्षक आहात.
त्यामुळे हा भेदभाव का करता? एकीचे बळ हे फार
मोठे असते. त्यामुळे तुम्ही पाचही श्रेश्ठ व जेश्ठ आहात.
विनाकारण भांडत बसण्याने
षरीररुपी देहाला त्रास सहन करावा लागतो. षेवटी निकाल देताना मला एवढेच नमूद
करावेसे वाटते की, मैत्री असती कषी
तर हात व डोळयासारखी, हाताला इजा झाली
तर डोळयात पाणी येते व डोळयात पाणी आले तर ते पाणी पुसण्यासाठी हातच पुढे येतात.
त्यामुळे तुमचे प्रत्येकाचे मूल्य अमूल्य आहे. तुमच्या हाताला मायेचा वारसा लाभला
आहे.
त्यामुळे तुम्ही इतरांना माया देता. पाठीवरुन हात फिरविता. त्यामुळे मानवी
षरीराचे रक्षण तुमच्यामुळे होत असताना का बरे तुम्ही एकमेकांत भांडता व भेदभाव
करता. तुम्ही सर्व मानवी देहाची षोभा आहात. हात आहे तर मानवाला ताकद आहे. त्यामुळे
तुम्हा सर्वांना षुभेच्छा देऊन हा खटला निकालात निघाला असे नमूद करतो.
निकालानंतर पाचही बोटे एकत्र येवून मिठया मारुन
नाचू लागली व म्हणू लागली, ‘आम्ही पाच एक
साथ। नवी दिषा - नवी आषा। देहाच रक्षण हेच आमचं आरक्षण।। ’
COMMENTS